Home Latest News स्मार्ट मीटर पोस्टपेडच राहणार; प्रीपेडची भीती निराधार – मुख्य अभियंता राजेश नाईक

स्मार्ट मीटर पोस्टपेडच राहणार; प्रीपेडची भीती निराधार – मुख्य अभियंता राजेश नाईक

0

<p><strong>&&num;8211&semi; स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांमध्ये दहशत निर्माण करू नये&semi; अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ठाम मागणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर हे पोस्टपेडच राहतील&comma; ते प्रीपेड करण्यात येणार नाहीत&comma; असे स्पष्ट केले&period; मात्र&comma; स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांना २४ तासांच्या अल्टिमेटमच्या नोटिसा देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करणे पूर्णपणे अयोग्य असून अशा प्रकारांना तातडीने आळा घालावा&comma; अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली&period; ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या मुख्य अभियंता राजेश नाईक यांची भेट घेऊन स्मार्ट मीटर संदर्भातील विविध तक्रारी आणि ग्राहकांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या&period; यावेळी ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या २४ तासांच्या नोटिसा&comma; त्यातील कारवाईची भाषा आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या इशाऱ्यांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली&period; अशा प्रकारच्या नोटिसा नियमबाह्य असून त्या तातडीने थांबविण्यात याव्यात&comma; अशी मागणी करण्यात आली&period; यावर प्रतिक्रिया देताना मुख्य अभियंता नाईक यांनी स्पष्ट केले की&comma; स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे मीटर प्रीपेड होणार नाहीत&period; वीज बिलाची पद्धत पूर्वी प्रमाणेच पोस्टपेड राहणार आहे&period; स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वीज वापराची आणि बिलाची अद्ययावत माहिती तत्काळ उपलब्ध होईल&period; त्यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे&comma; वीज बचत करणे आणि बिलांबाबत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल&period; ते पुढे म्हणाले की&comma; स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून&comma; वीज चोरीस प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल&period; ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी महावितरण तर्फे विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येतील&period; स्मार्ट मीटर आणि पारंपरिक मीटरमध्ये कोणताही आर्थिक तोटा ग्राहकांना होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले&period; स्मार्ट मीटर बसविण्याच्या सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात विरोध होणे स्वाभाविक असले&comma; तरी योग्य माहिती दिल्यानंतर तो कमी होत असल्याचा अनुभव असल्याचे सांगून&comma; ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period; ग्राहकांनी मागणी केल्यास अशा कार्यक्रमांबाबत महावितरण सकारात्मक निर्णय घेईल&comma; असेही त्यांनी नमूद केले&period; यावेळी सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांनी वीज बचतीकडे अधिक लक्ष द्यावे&comma; घरातील अर्थिंग व्यवस्थित आहे का&comma; वायरिंगमध्ये दोष नाही ना&comma; याची तपासणी करावी&period; अर्थिंग किंवा वायरिंगमधील दोषांमुळेही वीजबिल वाढू शकते&comma; याकडेही मुख्य अभियंता नाईक यांनी लक्ष वेधले&period; या शिष्टमंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सदस्य गजानन पांडे&comma; नागपूर शहर कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी&comma; नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे&comma; महानगर सचिव राजू पुरसेटकर&comma; सहसचिव समीर जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते&period; ग्राहक पंचायतने महावितरणला ग्राहकांशी सुसंवाद साधून स्मार्ट मीटर बाबतचे गैरसमज दूर करण्याचे तसेच स्मार्ट मीटर बसविताना कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही&comma; याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version