किशोर साहू, मौदा :- जि प प्राथमिक शाळा कोदामेंढी येथे पहिल्या सत्राचा समारोप नुकताच दिवाळी मिलन कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज खडसे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पूजा शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शुभांगी उत्तमवार,अमोल किटे, मुख्याध्यापक मनोज मानकर, शिक्षकवृंद रजनी काचुरे, ज्योती मालानी,संभाजी जाधव,कुमारी कदम सह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.






