Home Latest News माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार! १५ दिवसांत बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार! १५ दिवसांत बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

0

<p><strong>नवी मुंबई&colon;<&sol;strong> आगामी १५ दिवसांत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत आणि माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर बैठक घेण्यात येईल&comma; असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे&period; नवी मुंबईतील माथाडी मेळाव्यात ते बोलत होते&period; माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न&comma; साताऱ्यातील टाटा प्रकल्पातील प्रश्न आणि पुणे-नाशिक येथील कामगारांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>कै&period; आण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पणन मंत्री जयकुमार रावल&comma; बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले&comma; वनमंत्री गणेश नाईक&comma; माथाडी नेते नरेंद्र पाटील&comma; आमदार शशिकांत शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारने मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर भर दिला&period; सारथी संस्थेच्या माध्यमातून १२० हून अधिक आयएएस आणि आयपीएस अधिकारी तसेच १०४८ एमपीएससी अधिकारी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले&period; हे सर्व अधिकारी आज महाराष्ट्रात नोकरी करत आहेत&period; सरकार प्रत्येक समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कै&period; आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाला सर्वाधिक वेळा उपस्थित राहण्याचा विक्रम आपलाच आहे&comma; असेही फडणवीस यांनी सांगितले&period; तसेच&comma; आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने दीड लाख उद्योजक तयार केले असून&comma; त्यांना १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे&period; पुढील काळातही हे महामंडळ सरकारच्या पाठिंब्याने काम करत राहील&comma; अशी ग्वाही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना&comma; काही माथाडी कामगारांनी हातात फलक घेऊन आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला&period; त्यावेळी भाषण थांबवत&comma; &&num;8216&semi;ही आपलीच माणसं आहेत&comma;&&num;8217&semi; असे म्हणत फडणवीस यांनी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले&period; सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत १५ दिवसांत बैठक घेऊन दिवाळीची भेट देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनीही भाषणे दिली&period; माथाडी कामगारांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा&comma; अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली&period; त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न आणि एपीएमसीतील अडचणी सरकारसमोर मांडल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version