नागपूर :- नुकताच पार पडलेला टीचर्स म्युझिकल सिंगर्स ग्रुपतर्फे आयोजीत दिनांक २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भस्तरीय टीचर गायक आणि गायिकांना एकत्र करून दोन दिवसीय संगीतमय कार्यक्रम सीताबर्डी, नागपूर येथील अर्पण सभागृहात प्रमोदजी अंधारे यांच्याद्वारे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अथिती म्हणून पदवीधर नागपूर विभागाचे आमदार अभिजीत वंजारी व प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले तसेच मुख्य उपस्थिती वृंदा विकास ठाकरे आणि ग्रुपचे कार्याध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर या सर्वांनी आपली उपस्थित दर्शविली. असे सांगितिक कार्यक्रम नेहमी व्हावे आणि शिक्षक-शिक्षिका गायकांना रोजच्या धावपळीच्या दगदगीतून मोकळा श्वास घेण्यास मदत मिळावी आणि आपला छंद जोपासावे याकरिता हे व्यासपीठ अत्यंत गरजेचे आहे. करिता या कार्यक्रमासाठी अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, वृंदा विकास ठाकरे यांनी आर्थिक मदत करण्याचे कबूल केले. असे कार्यक्रम विदर्भ स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत अशी आशा पाहुण्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे उत्तम संचालन डॉ. विनोद बालकोटे, प्रा. प्रिया खटोले, रिना पुरी तसेच डॉ. नितू गुप्ता यांनी केले. या विदर्भस्तरीय दोन दिवस झालेल्या संगीतमय कार्यक्रमात अनेक शिक्षक- शिक्षिका गायकांनी आपली प्रस्तुती दिली. साऊंड सिस्टीम प्रवीणजी भिवगडे व टेक्नीकल जबाबदारी माधव लोखंडे यांनी सांभाळली. गायकांमध्ये टीचर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रा. प्रमोद अंधारे यांनी ‘अरे यार मेरी तुम भी हो गजब’ हे गाणं गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. व सचिव प्राचार्य राजू देशपांडे यांचे राजू चल राजू’ हे गाणं विशेष ठरले. तसेच गायकांमध्ये मार्गदर्शक सुनिल भुसे, हेमलता सलामे, डॉ. अरविंद काळे, अश्फाक शेख, भारती लोखंडे, श्याम डहाके, डॉ. दत्तात्रेय वझरकर, नितीन भोळे, प्रा. प्रकाश डहाके, राजेश धुंदाड, डॉ. सुशील गडेकर, राजेंद्र नांदुरकर, डॉ. संदिप सराटकर, डॉ. सुनिल भगत, विरेंद्र गुंफावार, विजया वैद्य,साधना पोहरे, प्रा. खुशाली कोडापे, सविता रेलकर, पूजा पदम, लीला पवार, कविता बागडे, रंजना देशपांडे, संध्या फुके, संगिता आरेकर, सुरेखा यादव, सरीता मिर्झापुरे, प्रतिभा केंद्रे, वंदना जनबंधू, कुमुदिनी राघोर्ते, वर्षा वनकर, संध्या वैद्य, कादंबरी राऊत वैशाली प्रयागी सविता गुंजेवार, मिनल ताजनेकर, जयंत गुजर, दिलीप बन्नोटे, प्रशांत मरसकोल्हे, दिलीप एलकुंचवार, दीपक सातपुते, संदिप जावळे, अरविंद पांडे, शंकर बहादुरे, आशिष महाजन, राजेश गवळी, अशोक तुरक्याल, सच्चिदानंद दारुंडे इत्यादिंनी सहभाग घेतला होता.








