spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घोगरा येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

तिरोडा :- संत शिरोमणी रविदास महाराज जयंती निमित्त घोगरा येथे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी तिन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

31 जानेवारी ला जनजागृती कार्यक्रम 1 फेब्रुवारी ला दहिकाला 1:30 तर सायंकाळी 5:30 वाजता भव्य रैली 2 फेब्रुवारी ला भोजन 4 वाजेपासून व सायंकाळी 9 वाजता जय बजरंग देवी जागरण प्रस्तुती दयानंद आगाशे व चमु यांचे कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक किरण पारधी, अध्यक्ष डॉ गोवर्धन चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, उपाध्यक्ष वनिता भांडारकर पंचायत समिती सदस्य, दिप प्रज्वलन मनोज डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख अतिथी प्रिती भांडारकर सरपंच ग्राम पंचायत घोगरा, योगीता डोंगरे उपसरपंच, प्रमोद बिसेन ग्राम विकास अधिकारी, सर्व ग्राम पंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.

Popular Articles