spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाला सुरुवात, ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर यांच्या मागणीला यश

किशोर साहू :मौदा, ता. २८:- शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून, भावी पिढीला सिकलसेल मुक्त करण्यासाठीची एक लोकचळवळ आहे. या मोहिमेत ० ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांची तपासणी, आपल्या कडे येणा-या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत करुन घेण्यासाठी उपकेंद्र – चाचेर प्रा. आ. केंद्र येथे आरोग्यकर्मचाऱ्यांकडून गावोगावी सर्वे करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी सीएचओ डॉ. तक्षशीला मेश्राम,आरोग्य सहायक पीएचसी तारसा मिना लेंडे ,आरोग्य सेवक विनोद लांडगे आरोग्य सेविका इंदू मनगटे आशा सविता बावणे, आयुर्वेदिक दवाखाना चाचेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी गहूकार या अभियानाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. चाचेर ग्रा पं सदस्य शैलेश कोपरकर यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत चाचेर येथे सिकलसेल तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

Popular Articles