खापा :- महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्य विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. विधार्थ्यांचा बौद्धीक, मानसिक, शारिरीक आरोग्याविषयक केंद्र स्थानी ठेवण्यात आला. त्या अनुषगांने विद्यालयात एकाच वेळी वेगवेगळ्या मैदानावर व्हॉलीबॉल, कबड्डी, लंगडी, गोळाफेक, थालीफेक, बॅडमिंटन, २०० मीटर धावण्याची शर्यत, रस्सीखेच, फूगे स्पर्धा, फुटबॉल, टेनिसचे सामने आयोजित करुण आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य संदीप भोंडे यांनी महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्याचा मान यावेळी शिक्षक दिपक नारे यांना दिला. विधार्थ्यांना नेहमीच शुद्ध पाणी पुरावठा करता यावा, यासाठी (RO) आर ओ मशीनचे उद्घाटन प्राचार्य संदीप भोंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन हजारे यांनी केले. क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात महत्वाची भूमिका रामकृष्ण टेकाडे, विजय काडमेघ, ज्ञानेश दळवी, योगिता बुह्राण, दुर्गेश्वर चौधरी, बॉबी पर्बत, पूजा दहीकर, मारोती सोमकुवर, कुंदा बाजनघाटे, शुभम चटकवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.




