spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पुढील चार महिन्यात भंडारा ते नागपूर रस्त्याचे  सहा पदरी करणाच काम चालू होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.

भंडारा बायपासमुळे वाहतुक सुलभता होईल – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

नागपूर ०७ : भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाच काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा येथे केली .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या द्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा बायपास तसेच मौदा  वाय जंक्शन येथील सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांचे डांबरीकरण तसेच मजबूतीकरणाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज भंडारा येथील  महश्री विद्यामंदिर मैदान  अशोकनगर येथे त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी  ते बोलत होते .याप्रसंगी भंडारा-गोंदिया गोंदियाचे खासदार डॉ . प्रशांत पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते .

राष्ट्रीय महामार्ग-53 वरील 14.8 किमी लांब भंडारा बायपास भंडारा शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता.नागपूर-रायपूर-कोलकाता मार्गावरील जड वाहने यापुर्वी भंडारा शहरातील दुपदरी मार्गावर जात होते.ज्यामुळे अधिक विलंब व अधिक इंधन खर्च होऊन अपघातांचा धोका निर्माण होत होता. भंडारा बायपासमुळे वाहतुक सुलभता होईल, असे  नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले .
भंडारा  बायपास हा हरीत क्षेत्र ग्रीनफील्ड मध्ये अंशिक एक्सेस नियंत्रण,सर्विस रोड्स,उड्डणपुल आणि अंडरपास सह तयार करण्यात आलेला आहे.ज्यामुळे स्थानिक आणि दुरच्या वाहतुकीच्या प्रवासाचे विभाजन करुन प्रवास सुरळीत करतो.यासोबत वन्यप्राणी व वाघांच्या मार्गाचा विचार करुन अंडरपास,ध्वनी अवरोधक सोबत चेन लिंक फेसिंग यांचा समावेश केलेला आहे.
आज मानेगाव येथील व्हेहीकुलर ओवरपास  व ब्लॅक स्पॉट सुधारणा लांबी -1.9 कि.मी,बपेरा ते तुमसर राज्य मार्ग  लांबी 18 कि.मी  आणि खापा ते भंडारा राज्य मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण लांबी 28 कि.मी या तीन कामाचे  डिजीटल भुमीपुजन संपन्न झाले.तसेच भंडारा बायपास व मौदा वाय जंक्शन 6 लेन  उडडाणपुल या दोन विकासकामांचे डिजीटल लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले.सकाळी वैनगंगा नदीवर जलपुजन व भंडारा बायपासची पाहणी केल्यानंतर महर्षी विदयामंदीर येथील कार्यक्रमास ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एच.एम.सिन्हा यांनी केले.

तत्पुर्वी आज सकाळी  नागपूर जिल्ह्याच्या भंडारा रोडवरील मौदा वाय जंक्शन येथे असलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केले .या पुलाची लांबी 1.44 किलोमीटर असून सुमारे 84 कोटी रुपयांच्या तरतुदीने हा पूल बांधण्यात आला आहे .या उड्डाणपुलामुळेमौदा वाय जंक्शन वरील वाहतुकीमध्ये सुधारणा येऊन येथील दुर्घटना टळणार आहेत .
यावेळी त्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केली यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच विधान परिषदेतील आमदार परिणय फुके उपस्थित होते .

प्रकल्पाची संक्षिप्त टिपणी
भंडारा बायपास उद्घाटन

1 )  कामाचे नाव  : एन.एच.-53 च्या किमी 485.000 ते किमी 499.800 पर्यत
सहापदरी भंडारा बायपास चे बांधकाम

2 ) प्रकल्पाची एकुण किंमत   :रु.735.00करोड

3 ) प्रकल्पाची लांबी    : 14.800 किमी.

4 )कराराची दिनांक    :  27/01/2022

5 )काम सुरु करण्याची दिनांक :06/04/2022

6 ) कंत्राटदाराचे नाव  : श्री.स्वामी समर्थ इंजिनियर्स लिमीटेड,पुणे

7 ) कार्य देखरेख       : टी.पी.एफ.इंजिनीयरिंग प्राय.लिमिटेड

8 ) वाहतुक             : 28564  पी.सी.यु.

• प्रकल्पाची ठळक वैशिष्टे
• मुख्य रस्ता : सहापदरी मार्ग
• डिजाईन वेग :100 कि.मी./घंटा
• बायपास ची लांबी : 1034 किमी
• सर्विस/ स्लीप रोड  : रूंदी  7 मीटर एकुण लांबी 17.46 किमी दोन्ही बाजुस पक्की ड्रेनेज सहित
• उडाणपुल : 2 कारधा एवं अशोकनगर जंक्शन वर
• कारधा : 1×24.00+2×30.00+1×24.00 मीटर

• अशोकनगर : 1×24.00+1×30.00+1×24.00 मीटर

• वाहन अंडरपास  :  17

• वन्य प्राण्यांसाठी अंडरपास : 2 भिलेवाडा येथे प्रत्येक 2×40 मीटर स्पॅन

• प्रमुख पुल : 3 वैनगंगा नदी-700 मीटर,गोसीखुदे

• छोटे पुल : 3

प्रकल्पाची सुविधा
• बस बे आणि शेड्स : 6 ठिकाणी दोन्ही बाजुस-चांदोली
• भिलेवाडा,पिंपरी,सालेबर्डी,खापा,मुजबी
• स्ट्रीट लाईटिंग : मुख्य रस्ता आणि सर्विस रोड वर
• हाई मास्ट लाईट्स : उड्डणपुल आणि मुख्य चौ-रस्त्यावर
• मध्ये व रोडच्या बाजुस वृक्षारोपण
• वन्यजीव मार्गावर मे चेन लिंक फेसिंग सहित ध्वनी अवरोधक लावण्यात आले आहे

प्रकल्पाचे लाभ :
• भंडारा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती द्वारे चिंन्हांकित केलेले ब्लॉक स्पॉट-पलाडी आणि भिलेवाडा मध्ये-या मार्गाच्या बांधकामामुळे समाप्त करण्यात आले.
• नागपूर ते रायपूर व छत्तीसगढ राज्यातील प्रवासी आणि मालवाहतुक वाहनासाठी सुधारीत जोडणी
• वैनगंगा नदी वर नवीन सहापदरी उड्डणपुलामुळे भंडारा शहरातील होणारा वाहतुकीच्या अडथळा दुर झाला
• भंडारा शहरात सुलभ व सुरळीत वाहतुक
• या प्रकल्पामुळे पुर्वीच्या दुर्गम शेती पट्टयांना चांगली जोडणी झालेली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.