spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमान गावातील मुख्य रस्ता 14 जूनपर्यंत मोकळा करा अन्यथा पुन्हा 17 जून पासून मौदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन 

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत तुमान सरपंच धम्मजीत गजभिये यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांसह तुमान गावातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून, रस्ता मोकळा करण्यासाठी 9 जूनला तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने ‘तुमान गावातील मुख्यरस्ता मोकळा झालाच पाहिजे, तहसील प्रशासन हाय हाय’असे हाती फलक घेऊन व घोषणा देत आंदोलन केले. निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी संजय पवार यांना देऊन 14 जूनपर्यंत तुमान गावातील मुख्यरस्ता मोकळा करा, अशी विनंती केली. 14 जून पर्यंत मुख्य रस्ता मोकळा न झाल्यास 17 जून पासून पुन्हा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

Popular Articles