spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आज त्रिपुरी पौर्णिमा निमित्त भव्य कीर्तन व महाप्रसाद 

किशोर साहू, मौदा :- मागील १०० वर्षाच्या परंपरेनुसार यंदाही चाचेर येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान समितीतर्फे त्रिपुरी पौर्णिमा निमित्त तालुका, जिल्हा भंडारा, पोस्ट शहापूर अंतर्गत येत असलेल्या कवडश गावातील ह भ प निरज निवृती मंडारी महाराज यांच्या बुधवार (ता. २५ नोव्हेंबर)ला दुपारी १२ ते ४ वाजता दरम्यान भव्य कीर्तन, ४ वाजता गोपालकाला, सायं. ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील १०० वर्षांपूर्वीपासून या मंदिरात गावातील भावी ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ त्रिपुरी पौर्णिमेच्या एक महिन्यापूर्वीपासून पहाटेला नियमित दररोज काकड आरती करतात. या काकड आरतीचा समारोप कीर्तन, दहीकाला व महाप्रसादाने होत असते. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Popular Articles