spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

कामठी :- कामठी येथील जयस्तंभ चौकातील वृत्तपत्र विक्रेता झोनमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा (हॉकर्स) कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. कामठी तालुका प्रतिनिधी संदीप कांबळे यांच्या हस्ते ८२ वर्षीय ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुरेश अढाऊ, ८० वर्षीय रामु सांगोडे तसेच कामठी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष दिपंकर गणविर यांच्यासह प्रफुल लूटे, निखिलेश डोंगरे, रोशन सपाटे, राजेश काटरपवार, किशोर खेडकर, प्रदीप गायगवळी, कृष्णा पटेल, देवेंद्र बेहार, सुरेश बिसने, विलास बांगरे, प्रकाश बागडे, हुसेन अली, फैजान अन्सारी, वसीम अख्तर, निलेश ढोके, राजू मेश्राम आणि शमीम अख्तर आदी वृत्तपत्र विक्रेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी संदीप कांबळे यांनी वृत्तपत्र विक्रेते हे माध्यम क्षेत्रातील खरे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. उन्हाळा, पावसाळा किंवा कडाक्याची थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत वेळेवर वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे त्यांचे समर्पित कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले,


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.