spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाईक रॅलीच्या माध्यमातून हिंद की चादर श्री गुरू तेगबहादूर सिंग साहिबजी यांच्या बलिदानाला नमन

नागपूर :- हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर सिंग साहिब जी यांच्या ३५०व्या शहिदी समागम समारोहानिमित्त राज्यस्तरीय समितीच्या वतीने बाबा बुधाजी नगर, खालसा गुरुद्वारा चौक येथून रविवारी (ता.३०) बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येत भाविकांनी रॅली मध्ये भाग घेत गुरूतेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदान, मानवता, धार्मिक स्वातंत्र्य,एकता व बंधुभावाचा संदेश दिला. रॅलीच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर सिंग साहेबजी यांच्या बलिदानाला नमन करण्यात आले.

हिंद की चादर श्री. गुरु तेग बहादूर सिंग साहब जी यांचे योगदान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी नारा येथील कुकरेजा मैदानात विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ५ लाख शिख बांधव व इतर नागरिक एकत्र जमणार आहेत. याच्या यशस्वीतेसाठी व अधिकाधिक लोकांपर्यंत या समागम समारोहाचा संदेश पोहचावा या उद्देशाने ही बाईक रॅली काढण्यात आली.

महाराष्ट्र शासन आणि हिंद की चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीचे विदर्भ क्षेत्राचे अध्यक्ष सरदार गुरमित सिंग खोक्कर यांनी झेंडी दाखविली. याप्रसंगी समागम समन्वयक रामेश्वर नाईक, धर्मजागरणचे महेंद्र रायचुरा, सुनील भुलगावकर, गुरुद्वारा प्रधान सुखविंदर सिंग पाल, मलकीत सिंग बल, गुरूदयाल सिंग पड्डा यांच्यासह इतर प्रामुख्याने उपस्थित होते.

रॅलीची सुरुवात गुरूद्वारा श्री तेज बहादुर, बाबा बुधाजी नगर, खालसा गुरुद्वार येथून झाली, त्यांनतर ऑटोमोटिव्ह चौक होत कामगार नगर चौक, गुरुद्वारा गुरु हरगोविंद सिंग साहिब, गुरुद्वारा मतीदास , गुरुद्वारा शहीद दीप सिंग, पॉवर ग्रीड चौक, तथागत चौक, लाल गोदाम, गुरुद्वारा कलगीधर दरबार बुध्दनगर, गुरुद्वारा गुरु नानक दरबार गुरमीत खोकर, १०नंबर पुलीया, गुरुद्वारा सिंग सभा कामठी रोड, पाटणी ऑटोमोबाईल, वीरास्वामी माउंट रोड, हल्दीराम सदर, छावणी चौक, गोंडवाना चौक, ईटारसी पुलिया, जिंजर मॉल, भीम चौक, जरीपटका पोलीस ठाणे पर्यंत रॅली पोहचली. ठीक ठिकाणी पुष्पवर्षाव करीत रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कुकरेजा मैदान येथे रॅलीचे समापण झाले.

रॅली यशस्वी होण्याकरिता विदर्भ क्षेत्राचे सचिव प्रीतपाल सिंग भाटिया, उपाध्यक्ष परमजीत सिंग भट्टी, सहसचिव गजेंद्र सिंग लोहिया, गुरू बावरा, गुरू प्रतापसिंग, देवेंदर सिंग ढिल्लो, जसमित टूटेजा, चंचल ढिल्लन, एकविंदर सिंग भाटिया, गुरुजीत सिंग भामरा, जग्गा भामरा, मणीनंदर सिंग डडीयाल, गुरुमित सिंग भाटिया यांनी सहकार्य केले.

मनपा शाळाद्वारा प्रभात फेरी

नागपूर महानगरपालिकेत द्वारा हिंद की चादर श्री गुरु तेगबहादूर सिंग साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम समारोह निमित्त रविवारी मनपाच्या एम ए के आझाद इंग्लिश उर्दू माध्यमिक शाळा आणि दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे हिंद की चादर प्रभात फेरी काढण्यात आली.

Popular Articles