Raksha Mantri Rajnath Singh, on September 25, 2026, flagged-in the First Ascent Mountaineering Expedition that scripted history by summiting 20 unclimbed peaks above 6,000 meters in Ladakh in just 23 days. This is the first-ever recorded summits of 20 unclimbed peaks in Chamser-Lungser, Gyama Nala and Chokula areas in Ladakh Range. The expedition was undertaken by a team of 20 highly skilled climbers from the National Institute of Mountaineering and Adventure Sports (NIMAS), Dirang, led by Col Ranveer Singh Jamwal.
Interacting with the expedition team, Raksha Mantri commended the courage and determination of the climbers in accomplishing the historic feat. He described the expedition as a demonstration of India’s mountaineering excellence and leadership in adventure sports.
Terming the climbers as a source of inspiration, Rajnath Singh added that the successful ascents set new benchmarks and would encourage young mountaineers across the country to pursue adventure & exploration and make the nation proud.
The expedition showcased exceptional planning, technical expertise, endurance and teamwork. It reflected the nation’s capabilities in high-altitude mountaineering, strengthening its presence on the global mountaineering map. It was organised to promote the spirit of adventure & exploration in the high-altitude frontiers and inspire future generations of mountaineers.
Defence Secretary Rajesh Kumar and other senior officials of the Ministry of Defence were also present during the flag-in ceremony at Kartavya Bhavan-2 in New Delhi.
यवतमाळ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22, 23 सप्टेंबरला गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळगाव येथे शालेय जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धा संपन्न झाली.
जिल्ह्यातील वय 14 वर्षआतील, 17 वर्षा आतील आणि 19 वर्षा आतील एकूण 219 मुले/ मुली स्पर्धकांनी भाग घेतला. कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल मधील 14 वर्षा आतील ओपन साईड रायफल मध्ये शिवम महेंद्र राचलवार प्रथम, शिवम गणपत तायवाडे द्वितीय आणि श्रेयस राजू राऊत तृतीय क्रमांक पटकाविला.
एअर पिस्तूल मध्ये श्रेयश विशाल पिंपरे द्वितीय क्रमांक आणि मुलींमधून वेदांती संतोष रावते तृतीय क्रमांक पटकाविला.
जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांमधून सर्वात जास्त लाभ पुरन तांडेकर यांनी100/61 गुण प्राप्त करून 17 वर्ष आतील गटात ओपन एअर रायफल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत अमलोकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना 4 गोल्ड 4 सिल्वर आणि 2 ब्रांच मेडल मिळाले.
क्लब मध्ये प्रॅक्टिस करणारे स्थानिक महिला विद्यालय, नेपच्यून इंग्लिश मीडियम स्कूल, शिवशक्ती विद्यालय कोठा तसेच पी एम बी इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज बाबुळगाव इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब चे नाव लौकिक केले.
क्लबचे 25 विद्यार्थ्यांनी प्रथमच जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय शूटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
नागपूर :- नागपूर येथील दीक्षाभूमीवर 20 ऑक्टोबर रोजी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा देशभरातील अनुयायांसाठी महत्त्वाचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, आदित्य मिरखेलकर, सिंगा रेड्डी, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अनुयायांच्या सोयी-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून महोत्सवाचे नियोजन करावे, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. दीक्षाभूमी परिसरात निवासासाठी जर्मन हँगर तंत्रज्ञानावर आधारित निवारा कक्ष उभारण्यात येणार असून, त्यामध्ये पंखे, कुलर्स, प्रकाशयोजना तसेच अंथरूण-पांघरूणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या निवारा कक्षांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी संबंधित नावे देण्यात येणार आहेत. निवारा कक्षांच्या परिसरात संविधान साहित्याची ‘भीमसृष्टी’ उभारण्यात येणार आहे. तसेच तक्रार निवारण केंद्र, महिलांसाठी हिरकणी कक्ष, बालकांसाठी खेळण्याची जागा आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.
अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधसाठा, वैद्यकीय कक्ष, मोबाईल हॉस्पिटल आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. स्वच्छतेसाठी नियमित स्वच्छता, जंतुनाशक व डास प्रतिबंधक फवारणी, मोबाईल टॉयलेट्स आणि कचराकुंड्यांची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, महिला सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच अनुयायांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक, दिशादर्शक नकाशे आणि उद्घोषणा प्रणालीची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा सुरळीतपणे पार पाडावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
नवी दिल्ली :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त व सचिव डॉ श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्र जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, लेखाधिकारी निलेश केदारे यांसह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
· छत्तीसगड व बिहारच्या पत्रकारांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई :- आज टेलिव्हिजन, डिजिटल व समाज माध्यमे आली असली तरी देखील वृत्तपत्रांची विश्वसनीयता अधिक आहे. रेडिओ आल्यानंतर दूरचित्रवाणी येण्यास मोठा कालावधी गेला. परंतु अलीकडे नवनवी माध्यमे झपाट्याने येत आहेत. समाज माध्यमांमध्ये आज असत्य व अर्धसत्य माहितीचा महापूर आला आहे. या पुरातून ‘सत्य’ वेगळे करून ते जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्रकारांना केले.
भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसेच बिहार राज्यातील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा, छत्तीसगड व बिहार येथील विविध माध्यम समूहांचे पत्रकार व प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पत्रकारिता हा लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ आहे असे सांगून क्षेत्रीय भेटी दिल्याने पत्रकारांना एखाद्या विषयाचे समग्र आकलन होण्यास मदत होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. पत्रकार हे शासन व समाजात सेतूचे कार्य करीत असतात. ‘स्तंभ’ हा नेहमी सरळ व मजबूत असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
वृत्तांकन करीत असतानाच पत्रकारांनी नशामुक्त भारत अभियान, टीबीमुक्त भारत मोहीम आदी कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीचे काम करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
शासन योजना तयार करते व त्यांची अंमलबजावणी करते. या योजनांबाबत जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी करावे असे राज्यपालांनी सांगितले.
मुंबई :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्षअधिकारी दत्तात्रय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्र. प्र. कोपार्डे, सुनील जाधव आदींसह मंत्रालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
– वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची घोषणा
ठाणे :- माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नसून तो कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे तीन हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
माथाडी चळवळीचे संस्थापक स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यास वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनोज जामसुतकर, डॉ. प्राची पाटील, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, विजय सावंत, एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, रविकांत पाटील, सुबोध रुणवाल, अविनाश रणखाम, निधी डोगरा, भरत चव्हाण, नगरसेविका ॲड.भारती पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि माथाडी कामगार उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करणारी अंत्योदयाची भूमिका पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. तीच भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या कष्टकरी, असंघटित कामगारांना संघटित करून त्यांनी माथाडी कायदा अस्तित्वात आणला आणि कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज माथाडी कामगार ताठ मानेने समाजात उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय अण्णासाहेबांच्या त्यागाला जाते.
माथाडी कायद्याच्या संरक्षणाचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा कायदा कामगारांचे सुरक्षा कवच आहे. काही घटकांकडून हा कायदा संपवला जाईल असा संभ्रम निर्माण केला जात असला तरी शासन हा कायदा अधिक मजबूत करेल, तो संपू देणार नाही. मात्र, या पवित्र कामगार चळवळीच्या नावावर काही खोट्या टोळ्या तयार झाल्या असून त्या कामगारांचे नुकसान करत आहेत. या अनधिकृत प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आणि खऱ्या कामगारांचे हित जपण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील. यासोबतच 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांसंदर्भातील नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कामगार विभागाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व 36 माथाडी मंडळांचे सक्षमीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंडळांच्या कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी स्वतंत्र पॅनेलद्वारे लेखापरीक्षण केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय आणि परवानग्या देण्यात आल्या असून, सुमारे 3 हजार माथाडी कामगारांना आधुनिक व हक्काची घरे दिली जातील. तसेच कामगारांसाठी भविष्यात आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.
वाशी एपीएमसी मार्केटच्या आधुनिकीकरणावर भर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे मार्केट त्या काळी आशियातील मोठे केंद्र होते. आता बदलत्या व्यापार पद्धतींचा आणि वाढत्या उलाढालीचा विचार करून वाशी मार्केटचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी जमिनीखाली आणि जमिनीवर आवश्यक तो सर्व एफएसआय शासन उपलब्ध करून देईल. या आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांना अधिक प्रमाणात शाश्वत रोजगार मिळेल.
शेवटी, माथाडी कामगारांच्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामगारांच्या मुलांनी केवळ माथाडी कामापुरते मर्यादित न राहता डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’च्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि कौशल्य विकासासाठी स्वतंत्र योजना आखल्या जातील, ज्यास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. “आम्ही सदैव तुमच्याच पाठीशी आहोत,” अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी कामगारांना आश्वस्त केले.
वन मंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीवर भर दिला. अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून मिळवून दिलेल्या कायदेशीर संरक्षणामुळेच माथाडी कामगारांना समाजात मान-सन्मान मिळाला आहे, याचे स्मरण करून देत नाईक म्हणाले की, आता कामगारांच्या पुढच्या पिढीने केवळ श्रमापुरते मर्यादित न राहता शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, सीए आणि सनदी अधिकारी बनले पाहिजे. कामगारांच्या आरोग्यासाठी माथाडी रुग्णालयाच्या सुविधांचे आधुनिकीकरण आणि वडाळा प्रकल्पातील घरांचे काम विनाविलंब पूर्ण व्हावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. शेतकरी माल पिकवतो, परंतु तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या विपणन साखळीत माथाडींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वाशी मार्केटच्या इमारती आता जीर्ण झाल्या असून, बदलत्या जागतिक व्यापाराची गरज ओळखून या संपूर्ण बाजारपेठेचा अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर पुनर्विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण कितीही आले तरी माथाडी कामगारांचे काम आणि महत्त्व अबाधित राहील, असे स्पष्ट करत 50 किलो वजनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी चळवळीची एकता आणि कायदेशीर संरक्षणाचा मुद्दा मांडताना सांगितले की, माथाडी कायद्याला कोणत्याही प्रकारे धक्का लागू न देणे ही सर्व कामगार प्रतिनिधींची सामूहिक जबाबदारी आहे. असंघटित कामगारांना हक्काचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि बोनस मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक कायद्याची मूळ चौकट कायम ठेवूनच त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत. माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्या अनधिकृत टोळ्यांवर प्रतिबंध घालून खऱ्या कष्टकरी कामगारांचे हित जपले पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मानकांनुसार हमाली करणाऱ्या कामगारांसाठी 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे ओझे नसावे, हा नियम असूनही बाजारात अधिक वजनाची पोती आणली जात असल्याचे नमूद करत त्यांनी या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच वडाळा येथील कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून कामगारांना हक्काची घरे मिळवून देणे, वाशी एपीएमसी मार्केटचा कालबद्ध पुनर्विकास करताना नोंदणीकृत माथाडी कामगारांना निवासी व व्यावसायिक गाळे मिळवून देणे आणि कामगारांच्या मुलांना विविध कल्याणकारी योजनांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रुणवाल ग्रुप चे उपाध्यक्ष महेश खेतपाल यांनी वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पासंबंधीचे सादरीकरण केले व या माथाडी कामगार बांधवांच्या हितासाठी रुणवाल ग्रुप सदैव कटिबद्ध राहील,अशी ग्वाही दिली.
आमदार निरंजन डावखरे यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळग्रस्त भागाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा करण्यासाठी धनादेश सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक भरत चव्हाण व ओंकार चव्हाण हेदेखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत माथाडी कामगारांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
नागपुर :- वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मुख्यालय में राजभाषा पखवाड़ा-2026 के अंतर्गत 25 सितंबर को स्व-रचित काव्य पाठ प्रतियोगिता का आयोजन किया गया। मुख्यालय के कार्मिकों ने अपनी शानदार और भावपूर्ण कविताओं की प्रस्तुति से कार्यक्रम को काव्यमय बना दिया।
कार्यक्रम के उद्घाटन सत्र में मुख्य अतिथि के रूप में महाप्रबंधक (मा.सं./अधि. स्था.) एवं राजभाषा प्रमुख राजेश कुमार सिन्हा उपस्थित रहे। प्रतियोगिता के निर्णायक के रूप में नागपुर विश्वविद्यालय के हिंदी विभागाध्यक्ष डॉ. मनोज कुमार पाण्डेय तथा वरिष्ठ साहित्यकार एवं योग एवं प्राकृतिक चिकित्सा विशेषज्ञ डॉ. प्रवीण डबली उपस्थित रहे।
प्रतियोगिता के आयोजन में वरिष्ठ प्रबंधक-राजभाषा उदयवीर सिंह, वरिष्ठ प्रबंधक (जनसंपर्क) मिलिंद चहांदे, प्रबंधक (मा.सं.) एवं जन सूचना अधिकारी प्रियंका सोनी, सहायक प्रबंधक (मानव संसाधन/राजभाषा) परिधि वर्मा, अनुवादक (राजभाषा) मुक्तेश्वर सोनकुसरे तथा पुस्तकालय सहायक वैष्णवी बोरिकर की सहभागिता रही।
कार्यक्रम का संचालन अनुवादक (राजभाषा) दीपक सिंह चौहान ने किया। प्रतियोगिता में प्रतिभागियों ने अपनी स्व-रचित कविताओं के माध्यम से विभिन्न विषयों को प्रभावशाली एवं भावपूर्ण ढंग से प्रस्तुत किया।
– मृत्युंजय एम्बेसडर पंकज चौधरी की पुलिस अधीक्षक ने की सरहाना
सचिन चौरसिया, रामटेक :- महामार्ग पर पुलिस सहायता केंद्र की शुरुआत, दुर्घटनाओं में घायल यात्रियों को तत्काल सहायता और समय पर उपचार प्रदान करने के उद्देश्य से की गई। 22 सितंबर को महामार्ग पुलिस विभाग के पुलिस अधीक्षक डॉ. लोहित मतानी ने इस सहायता केंद्र का उद्घाटन किया। दुर्घटना पीड़ितों को समय पर सहायता प्रदान करने वाले मृत्युंजय दूत और पत्रकार पंकज चौधरी के कार्यों की विशेष रूप से सराहना की गई। बोरडा गणेशी, तालुका पारशिवनी की रामटेक में एक दुर्घटना में मृत्यु हो गई। महिला गंभीर रूप से घायल हो गई थी। घटनास्थल पर मौजूद मृत्युंजय दूत पंकज चौधरी ने अपनी निजी गाड़ी रोककर एम्बुलेंस का इंतजार किए बिना घायल महिला को तुरंत अस्पताल पहुंचाने की कोशिश की। हालांकि, दुर्भाग्यवश अस्पताल ले जाते समय रास्ते में ही उनकी मृत्यु हो गई। इस अवसर पर दिखाई गई तत्परता, साहस और मानवता को देखते हुए महामार्ग पुलिस अधीक्षक डॉ. लोहित मतानी ने उन्हें मृत्युंजय दूत की उपाधि से सम्मानित किया। पत्रकार पंकज चौधरी के कार्यों की सरहाना करते हुए उन्होंने उन्हें फूलों का गुलदस्ता भेंट किया। इस बात पर जोर दिया गया कि दुर्घटना की स्थिति में मदद के लिए आगे आना और घायलों को तत्काल चिकित्सा उपचार दिलाने की कोशिश करना एक सामाजिक जिम्मेदारी की भावना है। इस कार्यक्रम में महामार्ग मंडल पुलिस निरीक्षक नरेंद्र वानखेड़े, सहायक पुलिस निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे, मृत्युंजय राजदूत सुरेंद्र डडमल और अन्य महामार्ग पुलिस कर्मी उपस्थित थे।
संदीप कांबळे,कामठी :- कामठी तालुक्यातील वडोदा येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.या अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत वडोदा, महालगाव व तरोडी (बु)या तीन महसूल मंडळाचा समावेश असून कामठी तालुक्यातील एकूण 77 गावापैकी 49 गावांचा समावेश राहणार आहे तर कामठी तहसील कार्यालय अंतर्गत कामठी व कोराडी असे फक्त दोन महसूल मंडळ राहणार असून 28 गावाचा समावेश राहील. महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, त्यामुळे कामठी तालुक्यातील महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार आहे.
वडोदा येथे स्थापन होणाऱ्या अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वडोदा, महालगाव आणि तरोडी (बु.) या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांना महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अपर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यभरात नव्याने ४७ अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील वडोदाचाही समावेश आहे.
वडोदा येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित महसूल मंडळांतील नागरिकांना विविध महसूलविषयक कामांसाठी कामठी तहसील कार्यालयात येण्याची गरज कमी होणार आहे. जमीनविषयक नोंदी, महसूल प्रकरणे, विविध दाखले तसेच शासनाच्या महसूल विभागाशी संबंधित सेवांना स्थानिक पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा आहे.
या कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यवाहीसाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्हाधिकारी, नागपूर हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
वडोदा येथे अपर तहसील कार्यालयाची मंजुरी हा कामठी तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे.