सीताबर्डी में सुंदर कांड पाठ सम्पन्न.
अखेर सोनेगावला थांबणार जलद बस !
डॉ असरार अहमद का सत्कार.
Head Ticket Examiner Sets New Benchmark in Ticket Checking Revenue for Nagpur Division
Nagpur 27 – In a remarkable demonstration of commitment and alertness, Alok Kumar Jha, Head Ticket Examiner (HD TE), Nagpur, achieved the highest single-day revenue through ticket checking, recovering a total amount of ₹1,72,320/- from 220 irregular passengers.
Jha was on squad duty today aboard Train No. 03251 (Danapur – SMVT Special) between Itarsi and Nagpur. During the course of duty, he took strict and effective action against passengers found traveling without tickets and those occupying reserved sleeper class coaches with general class tickets.
His diligent efforts ensured strict adherence to railway rules, promoted rightful ticketing behavior, and contributed significantly to passenger revenue. This achievement highlights the critical role of ticket checking staff in curbing ticketless travel and upholding the integrity of the railway system.
Nagpur Division of Central Railway appreciates and commends Alok Kumar Jha for his exceptional performance, dedication, and vigilance. His achievement sets a benchmark for fellow staff and reinforces the importance of proactive field duties in strengthening Indian Railways’ operations.
NVCC व नागपुर तहसील कार्यालय के शासकीय योजना कार्ड 2 दिवसीय शिविर में 1100 से अधिक लोगो ने लिया लाभ
अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल – भिवापूर पोलिसांची कामगिरी.
भिवापूर दि. 27 – पोलीस स्टेशन भिवापूरच्या हद्दीत दिनांक २६ जून २०२५ रोजी गस्त घालत असताना पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, निलज येथून भिवापूर मार्गे उमरेडकडे अवैधरित्या व विनापरवाना रेतीची वाहतूक केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तास कॉलनी शिवार येथे नाकाबंदी केली असता, संशयित अशोक लेलँड १६ चाकी ट्रक (क्रमांक एम.एच.३५ ए.जे.१८२२) हा दिसून आला. सदर ट्रक थांबवून पोलिसांनी चालकाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव अमीर खान जमीर खान पठाण (वय ३२ वर्षे, रा. बाबा मस्तान शाह वार्ड, ता. व जि. भंडारा, ह.मु. सायका नगर, अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा) असे सांगितले. परवाना मागितल्यावर चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. वाहन मालकाविषयी विचारल्यावर, फुरकान अब्दुल लतिफ शेख (रा. घोटी, गोरेगाव, जि. गोंदिया) याचे वाहन असल्याचे सांगण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ७ ब्रास रेती (अंदाजे किमती ₹३५,०००/-) आढळून आली. तसेच ट्रकची अंदाजे किंमत ₹३०,००,०००/- असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹३०,३५,०००/- इतकी झाली. सदर प्रकरणी वाहन चालक आणि मालक याच्या विरूध्द पोस्टे भिवापुर येथे कलम ३०३(२), ४९(२) भा.न्या. सं सहकलम ४८ (७), ४८ (८) म.ज.म. संहीता सहकलम ४.२१. खान खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम, सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी ट्रक आणि रेती जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
विद्यार्थ्यांना विज्ञानाची सफर घडविणारी यंग कलाम डिस्कवरी सायंस सेंटर.
मनपा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन घडविण्यासाठी मनपाचा उपक्रम
नागपूर, ता. 27 : नागपूर महानगरपालिकेने एचसीएल फाऊंडेशन आणि एसईडीटी यांच्या सहकार्याने रामदासपेठेतील हिंदी मोर शाळेत यंग कलाम डिस्कव्हरी सायंस सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या विज्ञान केंद्रात ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध शाखांबद्दल माहिती दिली जाते व त्यातून मिळालेल्या ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन त्यांची चाचणी घेतली जाते. यातून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व विज्ञान दृष्टीकोन दृढ होण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे, केंद्राच्या उभारणीसाठी एचसीएल फाऊंडेशन द्वारे अर्थसहाय्य केले जात असून, सोशल इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टची ही संकल्पना आहे.
विज्ञान क्षेत्रात झालेले बदल आणि विज्ञानाची अनोखी दुनियेचे दर्शन घडविणारी सफर यंग कलाम डिस्कवरी सायंस सेंटरमध्ये घडविली जाते. नवे प्रयोग दाखविणारी डिस्कवरी सायंस सेंटर विद्यार्थ्यांना विज्ञानाची अधिक भुरळ घालते. त्याचबरोबर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासह वैज्ञानिक घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच या केंद्राला आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देत कार्याचे कौतुक केले होते.

एचसीएल फाऊंडेशनच्या परभणी येथील केरवाडी केंद्रातील विज्ञान प्रयोग आणि साहित्य नागपूरच्या या केंद्रात आणण्यात आले आहे. मनपा आणि एचसीएल यांच्यात २०१७ पासूनच या केंद्राच्या माध्यमातून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढवण्यावर आणि त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या जागरूक करण्यावर काम केले जात आहे. पूर्वी हे केंद्र इतवारी येथील लालगंजमध्ये होते, जे २०१९ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, रामदासपेठ येथे हलवण्यात आले. मनपाने या केंद्रासाठी तीन वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यांचे प्रयोगशाळेत रूपांतर करण्यात आले आहे.
यंग कलाम डिस्कवरी सायंस सेंटरच्या तीनही प्रयोगशाळेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक शास्त्रातील,खगोलशास्त्र व इतर शास्त्राचे विविध प्रयोगाचे अदभूत दर्शन होते. विद्यार्थ्यांमध्ये कुतहूल निर्माण व्हावी याकरीता विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळते. मनपाच्या शाळेतील पाचवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या केंद्रात आल्यावर त्यांची अर्धा तासात 30 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते. त्यानंतर परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सांगितले जाते. पुढे तीनही लॅबमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रातील फॅसिलेटर निखिल लक्षणे आणि कालीदास नाकाडे व इतर सहकारी यांच्यामार्फत माहिती दिली जाते. प्रत्येक विज्ञान प्रयोगाची सविस्तर माहिती दिली जात असल्याने वर्गात शिकलेल्यापेक्षा विद्यार्थ्यांना कृतीतून अधिक माहिती मिळते. सोशल इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य कुळकर्णी आणि एचसीएल फाऊंडेशन व्यवस्थापक पियुष वानखेडे यांच्या देखरेखीत उत्तम कार्य केले जात आहे.

शाळेतही आपण हेच शिकलो पण प्रत्यक्ष कृतीतून आणि नजरेखालून प्रयोग गेल्याने विद्यार्थ्यांचा आनंदही द्विगुणित होत असतो. तसेच केंद्रातही विविध प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, हुशारीची परीक्षा या प्रयोगातून घेतली जाते. यामुळे नवे ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानाविषयी ज्ञानाच्या कक्षा रुदांवण्यास मोठी मदत होत आहे. केंद्रात आल्यानंतर आणि प्रयोगशाळा पूर्णपणे पाहिल्यानंतर तीन तासानंतर विद्यार्थ्यांची दुसऱ्यांदा वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते. यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये मोठी वाढ होत असल्याचे केंद्राचे फॅसिलेटर निखील लक्षणे यांनी सांगितले. विज्ञानाचे विविध प्रयोग प्रत्यक्ष पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारतो. पुढे सायन्स फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांकडून मॉडेल तयार केले जाते. अनेकदा इन्सपायर अवार्ड सुद्धा विद्यार्थ्यांनी जिंकले आहे.
न्यूटनचा सिद्धांत, विविध खेळामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर
यंग कलाम डिस्कवरी सायंस सेंटरतर्फे तीनही वर्ग खोल्यात प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या तिन्ही प्रयोग शाळेत चंद्रग्रहण, सूर्यग्रहन, पवनचक्की, सोलार, आर्किमिडीजचा सिद्धांत,दृष्टीभ्रम, पिरिऑडिक टेबल, न्यूटनची रंग तबकडी, टॉवर ऑफ पिसा, डीएनए, ह्युमन बॉडी पार्ट, न्यूटॉनचा सिद्धांत,अंतवर्क, बहिवर्क, विविध गेम्स, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वॉटर हार्वेस्टिंग, वसुंधरा,मातीचे विविध प्रकार सह अनेक विज्ञानाविषयी माहिती या सेंटरमुळे मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या आणीबाणीवरील अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 26 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीतील अनुभवांवर आधारित ‘इमर्जन्सी डायरीज:इयर्स दॅट फोर्ज्ड अ लिडर’ (Emergency Diaries: Years that Forged a Leader’) या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. आणीबाणी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिगत राहून केलेले काम, बंदी घालण्यात आलेल्या साहित्याचे वाटप आणि जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, विजय (भाई) गिरकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशन ने हे पुस्तक प्रकाशीत केले आहे.
मनपातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन
नागपूर, ता.२६: आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त विजया बनकर,साप्रविचे अधीक्षक राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, नरेंद्र रामटेके शैलेश जांभूळकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार
वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश
मुंबई, दि. २६ : पक्षांच्या धडकेमुळे हवाई वाहतुकीला होणारा धोका कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने येत्या पंधरा दिवसात वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण करुन त्याला छप्पर टाकण्याची निविदा काढून काम तातडीने सुरू करावे. तसेच विमानतळाच्या परिसरातील कचरा संकलन केंद्र व क्षेपण भूमीवर पक्षी येऊ नयेत, यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक तज्ज्ञ तसेच तरुण अभ्यासकांकडून नव्या कल्पना जाणून घ्या, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले.
मुंबई विमानतळ परिसरात पक्षांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात दि. २५ जून रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, मुंबई अग्निशमन दल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपाययोजना सुचविण्यासाठी ‘हॅकेथॉन’ आयोजित करा
मुंबई विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात कचरा क्षेपणभूमी, कांदळवन अथवा वनक्षेत्र यामुळे पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विमान वाहतुकीला धोका निर्माण होत असतो.
विमानाला पक्षी धडकण्याच्या घटना वारंवार घडत असून सन २०२० मध्ये २०, सन २०२१ मध्ये ३५, सन २०२२ मध्ये ३६, २०२३ मध्ये ६०, सन २०२४ मध्ये ५९ तर जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत १९ पक्षी धडकल्याची नोंद झाली आहे. तसेच ठाणे खाडी परिसरात येणाऱ्या परदेशी पक्षांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सन 2015 मध्ये 10 हजार फ्लेमिंगो आले होते ती संख्या वाढली असून 2024 मध्ये 2 लाख फ्लेमिंगोची नोंद झाली आहे.
50 ते 200 फूट उंचीवर 2024 मध्ये 3 पक्षी धडकले होते 500 फूटापर्यंत 16 तर 500 ते 1000 फूटापर्यंत 13 धडकी झाल्या. 3 हजार पेक्षा जास्त उंचीवर 11 धडकी झाल्याच्या नोंदी झाल्या आहेत.
मुंबईतील देवनार, कांजूरमार्ग डंम्पिंग ग्राऊंड आणि वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र हे विमानतळाच्या फनेल झोन मध्ये येतात. कचराभूमीत खाद्य मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षांचा वावर असतो. त्यामुळे विमानतळावर उतरणाऱ्या व येथून उड्डाण करणाऱ्या विमानांना धोका पोहचतो. ही समस्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करण्यात याव्यात याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने महापालिका याबाबत काय उपाययोजना करु शकते याचा आढावा घेण्यात आला. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.
यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, पक्षांना रोखण्यासाठीचे कोणतेही तंत्रज्ञान सध्या पालिककडे उपलब्ध नाही. एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कचऱ्याची विल्हेवाट लवकर लावण्याबाबत महापालिका विचार करीत असून याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधिन असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे ही समस्या सोडवण्याची गरज लक्षात घेऊन याचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करा, असे निर्देश मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले. तसेच यावर उपाययोजनेसाठी शास्त्रज्ञ, उद्योजक, तरुण अभ्यासक, स्टार्टअप यांना आवाहन करा, त्यांच्याकडून नवनविन कल्पना मागवा, त्यांची हॅकेथॉन आयोजित करा, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले. पर्यावरण विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसयटीची मदत घेऊन देणाऱ्या नवीन कल्पनांचा अभ्यास करावा. त्यानंतर हा अहवाल तयार करावा. सदर अहवालाचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अथवा राज्याची विमानतळ पर्यावरण कमिटी (एईएमसी) आहे त्यांच्याकडे जाऊन उपायोजनांबाबत सल्लामसलत करावी, असे निर्देश ॲड. शेलार यांनी यावेळी दिले.
विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे एकूण क्षेत्रफळ 2 एकरचे असल्याने त्याचे आधुनिकीकरण करण्यात यावे. यामध्ये शेड कव्हर उभारणे, दुर्गंधी नियंत्रण प्रणाली स्थापने, मोबाईल कॉम्पॅक्शन युनिट स्थापणे आदी उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठीच्या निविदा येत्या पंधरा दिवसात काढून लवकरात लवकर काम सुरू करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
विमानतळाच्या फनेल झोनमध्ये पक्षी दुर्घटना सारख्या बाबींवर विचार करण्यासाठी असणारी विमानतळ पर्यावरण कमिटीची बैठक लवकरात लवकर घेण्याची विनंती करु, असेही यावेळी मंत्री शेलार यांनी सांगितले. या समितीमध्ये पर्यावरण विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, मुंबई महापालिका तसेच विमानतळावरील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असतो.










