कुही २१ : पोलीस स्टेशन कुही दिनांक २०/०७/२०२५ रोजी कुही पोलीसांना पारधी वेडा येथे
अवैध्यरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे इसमाबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली. कुही पोलीसांनी पाच पथके तयार करून एकाच वेळी कार्यवाही केली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०५ महिला आरोपीचे ताब्यातुन ५२ ड्रम मध्ये एकुण ५२०० लिटर मोहाफुल सडवा कि. १,८२,०००/- रुपये, प्लास्टीक ड्रम किंमत १०,४००/- रुपये असा एकुण १.९२,४००/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने मोक्यावर पंचनामा कार्यवाही करुन नाश करण्यात आला आहे. ०५ महिला आरोपी यांचे विरुध्द पोस्टे कुही येथे कलम ६५ (ई) (फ) महाराष्ट्रदारुबंदी अधिनियम अन्वये ०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणा-या ५ आरोपीतांवर ५ गुन्हे नोंद कुही पोलीसांची कामगिरी
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.