WCLच्या उघड्या खाणीतून विस्थापनाचे संकट, शेतकऱ्यांचा आवाज अजूनही दडपलेला!
कामठी ता २१ :– सन २०१५ पासून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ने कामठी तालुक्यातील बिना संगम गावालगत उघड्या खाणीचे काम सुरू केले आहे. गावाच्या कडेला असलेल्या तीन नद्यांच्या संगमामुळे गावाला दरवर्षी पुराचा मोठा धोका निर्माण होतो. पुराच्या पाण्यामुळे गावातील नागरिकांचे घर, शाळा, आणि शेतीव्यवस्था अडचणीत येत असते..
गावकऱ्यांनी अनेक वेळा पुनर्वसनाची मागणी केली, यासंदर्भात मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आश्वासनेही दिली, परंतु योग्य निर्णयाअभावी गावातील नागरिक वास्तव्यास आहेत . जिल्हाधिकाऱ्यांची उदासीनता गावकऱ्यांच्या रोषाचे कारण बनली आहे.
WCL च्या सतत च्या ब्लास्टिंगमुळे गावात कंपन आणि आवाजामुळे नागरिक भयभीत आहेत. यामुळे लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे जमिनी WCL ने ताब्यात घेतल्या असून, त्यांना योग्य मोबदला, नोकऱ्या, आणि पुनर्वसन मिळालेले नाही.
पैशाच्या आणि नोकरीच्या लालसेमुळे कुटुंबात भाऊ-बहीण, वडील-मुलगा यांच्यात वाद होत आहेत. ही केवळ आर्थिक समस्या नसून, एक सामाजिक आणि मानसिक घडामोड देखील आहे.तेव्हा प्रशासनाने गावकऱ्यांची ही मागणी गांभीर्याने लक्षात घेत गावाचे तात्काळ पुनर्वसन करून नुकसान भरपाई देत शेतकऱ्यांना रोजगार आणि स्थायीत्व देत WCL चे काम थांबवून गावासाठी पर्यायी योजना आणावी मात्र असे होत नसल्याने
सरकारने आता तरी जागे व्हावे आणि बिना संगमच्या नागरिकांना न्याय द्यावा, हीच गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.