सचिन चौरसिया, रामटेक २१ : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ गांधी चौक येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील डागा सरकारी रुग्णालयातील मेट्रो ब्लड सेंटरने द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराबाबत तहसील आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता काकडे म्हणाल्या की, रक्तदानामुळे गरजू लोकांचे प्राण वाचण्यास मदत होते. डॉ. शिवानी धुर्वे आणि ‘आपला दवाखाना’च्या कर्मचाऱ्यांनी ते यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले