नागपुर २१ : दिनांक १९/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक २०/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये संतोष गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी, कन्हान उपविभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच कन्हान उपविभागातील पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत शिवनगर, फुकटनगर, शिवाजी नगर, धरमनगर पिपरी, सुपर टाउन आणि संताजी नगर येथे संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वात पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर वेळी पोलीस स्टेशन कन्हान येथील अधिकारी अंमलदार आणि दंगा नियत्रंण पथक चे पोलीस अंमलदार हजर होते. कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. गांधी चौक, कन्हान येथे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच रात्रगस्त दरम्यान अविनाश उर्फ लंगडा सुखचंद सहारे, वय २४ वर्ष, रा. तुकाराम नगर कन्हान, हा नागपुर जिल्हयातुन हद्दपार असतांना देखील मिळुन आल्याने पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांचे हददपार आदेशाचे उल्लंघन केल्याने नमुद आरोपीवर कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.