नागपूर,ता. १९ : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्बारे एलएडी कॉलेज आणि नागपूर फर्स्ट फाउंडेशन यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. यादरम्यान एकूण ५० रोपे लावण्यात आली.
याप्रसंगी मनपाचे उपायुक्त गणेश राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, नागपूर फर्स्ट फाउंडेशनचे संचालक तनवीर मिर्झा, प्राचार्य डॉ. पूजा पाठक, आयकॅक समन्वयक अर्चना मसराम आणि आयकॅक सह-समन्वयक कांचन बडे, डॉ. अश्विनी बाल्की, डॉ. चारिता पाटील, कल्याणी पिदाडी, डॉ. मीनाक्षी कुलकर्णी, डॉ. दिपाली चहांदे यांच्यासह एलएडी कॉलेजच्या विज्ञान आणि मानव्यविद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम मनपाचे उपायुक्त गणेश राठोड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. एलएडी कॉलेजच्या विज्ञान आणि मानव्यविद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात भाग घेतला. विशेष म्हणजे, परिसरातील रहिवाशांनीही लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन यावेळी विद्यार्थीनींनी दिले.