गडचिरोली २१ : गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन आज दिनांक 20/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, मौजा शिवणी, ता. व जि. गडचिरोली, येथील रहिवासी नामे मनोज वामन ऊईके हा त्याच्या स्वत:च्या स्विफ्ट या चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी विदेशी दारुची गडचिरोली शहरामध्ये वाहतूक करत आहे, अशा गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली-चामोर्शी रोडवरील सेमाना मंदीराजवळ सापळा रचला असता वरील वर्णनाप्रमाणे असलेले संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसून आल्यावर पोलीसांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा करुन सदर वाहनास रस्त्याच्या कडेला थांबविले. त्यानंतर सदर वाहनाच्या चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव मनोज वामन ऊईके रा. शिवणी, ता. व जि. गडचिरोली असे सांगितले.
त्यानंतर वाहन चालकास वाहन अडविण्याचे कारण सांगून पोलीस पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 1) 25 पेट¬ा देशी दारुचे बॉक्स, 2) 04 पेट¬ा विदेशी बियरचे बॉक्स मिळून आल्याने सदर मुद्देमाल व एक मारुती सुझुकी कंपनीचे स्विफ्ट चार चाकी वाहन असा एकुण 6,38,800/- (अक्षरी सहा लाख अडतीस हजार आठशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाबाबत वाहन चालकाकडे अधिक विचारपूस केली असता, सदरचा मुद्देमाल हा किरण तटपल्लीवार आणि लंकेस यांच्याकडून घेतला आहे असे त्याने सांगितले. यावरुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी नामे 1) मनोज वामन ऊईके रा. शिवणी, ता. व जि. गडचिरोली, 2) किरण ताटपल्लीवार व 3) लखन ऊर्फ लंकेस यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी मनोज वामन ऊईके, रा. शिवणी, ता. व जि. गडचिरोली यास सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली असून, त्यास मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सफौ/ कैलास नरोटे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत, पोहवा/दंडीकवार, पोअं/पंचफुलीवार व पोअं/कोडाप यांनी पार पाडली