कामठी ता २१ :-नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहर हे मेट्रोचे शहर होणार असून शहरातून मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.कामठी शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलवण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ व जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात कामठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून लवकरच कामठी शहरातून अतिक्रमण कारवाहीचा सपाटा सुरू होणार आहे .कामठी शहरात आधुनिक व्यापार संकुल निर्माण होणार असून कामठी शहरातून जाणारा नागपूर जबलपूर महामार्ग हा 7 मीटर वरून 18 मीटर रुंदीकरणाचा होणार आहे त्यासाठी या रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणचे सीमांकन करण्यात आले.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ,
कामठी तहसील प्रशासन विभाग, भूमि अभिलेख विभाग तसेच कामठी नगर परिषद प्रशासन विभागाने सदर अतिक्रमन जागेची संयुक्त पाहनी करून 18 मीटर ची सीमांकन मोजणी करण्यात आली.
कामठी शहरातून जाणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 44 हा 7 मीटर वरून 18 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे .केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे कामठी शहरात होणाऱ्या सतत च्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे त्यानुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ व जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात मेट्रो प्रकल्प विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ,तहसील प्रशासन,भूमी अभिलेख तसेच नगर परिषद प्रशासनाने नुकतेच संयुक्त कारवाही अंतर्गत जयस्तंभ चौक ते वारीसपुरा पुलिया, गोयल टॉकीज चौक तसेच ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया ते कमसरी बाजार चौक पर्यंत ची संयुक्त अतिक्रमण सीमांकन करण्यात आले.यामध्ये 1912 -13च्या सर्व्हेनुसार कामठी शहरातून जाणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग हा मूळ 18 मीटर चा रुंदीकरण होनार आहे त्यात अडसर ठरणारे अतिक्रमन काढण्यात येणार असून तत्पुर्वी कायद्याणुसार अतिक्रमन धारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे.हे संयुक्त सीमांकन करतेवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पराग ठमके , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे उपप्रबंधक युसुफ खान , मेट्रो चे उपप्रबंधक अजय रामटेके , डी एस एल आर कामठी चे मेहरखेडे, आणि नगर परिषद चे प्रशासक संदीप बोरकर,प्रदीप भोकरे, गफ्फु मेथीयां, रुपेश जैस्वाल आदिव अधिकारी व कर्मचारी वर्ग.उपस्थित होते..
बॉक्स:-नीलम लॉन च्या जागेत उभे राहणार आधुनिक व्यापार संकुल-कामठी शहरातील बस स्टॉप,तहसील व नगर परिषद परिसरात उभारण्यात येणाऱ्या वलं मेट्रो स्थानकाच्या पाश्वरभूमीवर येथील नीलम लॉन ते कामठी बस स्टँड चौकातील नझुलच्या जागेवरील अतिक्रमण पांडुन भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.या व्यापारी संकुलात व्यवसायिक गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असून वाहतुक
कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे.तसेच शुक्रवारी बाजार परिसराचाही विकास होणार असून येथील मटण मार्केट आदींचा पूर्णबांधकाम करन्यात येणार आहे.